कोणत्या देशात किती टक्के लोक एसी वापरतात?

भारत कितव्या क्रमांकावर आहे?

दिवसेंदिवस वाढत असलेली उष्णता आणि उष्माघातामुळे जगभरात दरवर्षी अनेक बळी जात आहेत.

दुसरीकडे याबद्दलचा विरोधाभास म्हणजे ज्यांना वाढत्या उष्णतेपासून वाचवायचे त्यांनाच नेमका आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग होत नाही.

यासंदर्भात इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीनं (आयइए) केलेल्या अभ्यासानुसार जगात एसी वापरण्याचं सर्वाधिक प्रमाण जपानमध्ये आहे.

जपानमध्ये ८४ टक्के घरांत, चीनमध्ये ७३ टक्के घरांत, तर ऑस्ट्रेलियामध्ये ६९ टक्के घरांमध्ये एसी वापरला जातो.

इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी आणि स्टॅटिस्टा कन्झ्युमर इनसाइट्सच्या माहितीनुसार टॉप १० देशांमध्ये ४ क्रमांकावर अमेरिका (६४ टक्के) आहे.

इटली पाचव्या क्रमांकावर असून, एसी वापरणाऱ्यांची संख्या ६१ टक्के आहे. त्यानंतर भारत सहाव्या क्रमांकावर आहे. भारतात हे प्रमाण ५६ टक्के आहे.

टॉप १० देशांमध्ये सर्वात कमी एसीचा वापर ब्रिटनमध्ये केला जातो. तिथे एसी वापरण्याचे प्रमाण १८ टक्के आहे. तर त्यापेक्षा जास्त २३ टक्के एसी वापरण्याचे प्रमाणे फ्रान्समध्ये आहे.   

'मुरांबा'मधील रेवा दिसतेय भारी, नवे फोटो बघा

Click Here