जगात सर्वाधिक पसंती चिनी नागरिकांची, भारतीय दुसऱ्या क्रमांकावर
'भविष्यातील कार्स' म्हणून इलेक्ट्रिक कार्सकडे सध्या बघितलं जातं. त्यामुळे सगळ्यांचाच या कार्सकडे जास्त ओढा आहे.
'नवीन कार घ्यायची झाल्यास तुम्ही कोणती कार निवडाल, पेट्रोल/डिझेल की इलेक्ट्रिक कार ?' असा हा सर्व्हे होता.
नुकत्याच घेण्यात आलेल्या या जागतिक सर्व्हेत चीनच्या तब्बल ४४%, तर भारताच्या ३७% ग्राहकांनी इलेक्ट्रिक कार्सना पसंती दिली.
पण याच इलेक्ट्रिक कार्सचा मोठा उत्पादक असलेल्या अमेरिकन ग्राहकांनी मात्र या कार्सना केवळ १९% पसंती दर्शवली.
ही आकडेवारी स्टॅटिस्टा कन्झ्युमर इनसाइट्सची आहे.