अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकण्यासाठी कोणत्या विमानाचा वापर केला होता?
दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले होते.
अमेरिकेच्या या अणुबॉम्ब हल्ल्यात लाखो लोकांनी आपले प्राण गमावले.
अमेरिकेने ६ ऑगस्ट १९४५ रोजी हिरोशिमावर आणि ९ ऑगस्ट १९४५ रोजी नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले.
पण, अमेरिकेने हे अणुबॉम्ब टाकण्यासाठी कोणत्या विमानांचा वापर केला होता माहितीये?
अमेरिकेने बी-२९ विमानातून हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकला होता.
अमेरिकन हवाई दलाचे कर्नल पॉल टिबेट्स यांनी सकाळी ८.१५ वाजता बी २९ विमानातून हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकला.
त्यांनी टाकलेला बॉम्ब खाली पडण्यासाठी अवघे ४३ सेकंद इतकाच वेळ लागला.
अमेरिकन हवाई दलाने नागासाकीवर अणुबॉम्ब टाकण्यासाठी देखील याच विमानाचा वापर केला होता.
नागासाकीवर टाकलेल्या बॉम्बला 'फॅट मॅन' असे नाव देण्यात आले होते.