सध्या प्रत्येक क्षेत्रात एआयचा वापर प्रचंड वाढला असून भारत ही एआयसाठी प्रमुख बाजारपेठ म्हणून उभी राहिली आहे.
देशात चॅटजीपीटीसह इतर एआय टूल्स अधिक वेगाने लोकप्रिय होत आहेत. चॅटजीपीटीने भारतासाठी केवळ ३९९ रुपये प्रतिमहिना असा जगातील सर्वात स्वस्त प्लॅन उपलब्ध केला आहे.
भारतात एआय वापर अधिक वेगाने वाढणार आहे. २०२५ मध्ये भारताचा चॅटजीपीटी वापरातील जागतिक हिस्सा १३.५% पर्यंत पोहोचला आहे.
अमेरिकेचा हिस्सा फक्त ८.९% आहे. त्यामुळे भारत हा जगातील सर्वात मोठा चॅटजीपीटी वापरकर्ता देश ठरला आहे.
तज्ज्ञांच्या मते, कमी दर, स्थानिक पेमेंट पर्याय (यूपीआय), तसेच भारतीय वापरकर्त्यांची नवी तंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी यामुळे भारत एआय वापरात जगाला मागे टाकले.
आता भारतात एआय कंपन्यांचे मासिक शुल्क बघायचे झाले, तर चॅटजीपीटी महिन्याला ३९९ रुपये, कोपायलट २००० रुपये, जेमिनी प्रो १९५० रुपये, सुपरग्रोक ७०० रुपये घेते.
भारतात सर्वाधिक वापर चॅटजीपीटीचा होतोय म्हणजे ८२ टक्के. त्यापाठोपाठ ९ टक्के लोक पर्लेक्सिटी एआयचा वापर करतात. ५ टक्के कोपायलट, तर २ टक्के गुगल जेमिनीचा.
खुर्चीवर बसून सुरू झालीये पाठ दुखी .... ९ सोपे व्यायाम प्रकार देतील आराम