जगात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो?

पावसाळा सुरू आहे. पण तुम्हाला माहिती आहे का जगात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? 

भारतात असे एक ठिकाण आहे तिथे दरवर्षी जगात सर्वाधिक पाऊस पडण्याचा विक्रम आहे.

जगातील सर्वात जास्त पाऊस भारतात असलेल्या चेरापुंजी नावाच्या ठिकाणी पडतो हे अनेकांना माहिती आहे.

पण आता ते ठिकाण मेघालयातील मावसिनराम आहे. चेरापुंजीपेक्षा 100 मिमी जास्त पाऊस पडतो.

या कारणास्तव या ठिकाणाचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले आहे.

हा देखील एक योगायोग आहे की जगात सर्वाधिक पाऊस पडणारी ही दोन ठिकाणे म्हणजे मावसिनराम आणि चेरापुंजी मेघालयात आहेत.

भारतातील ईशान्येकडील मेघालय राज्यातील राजधानी शिलाँगपासून ६० किमी अंतरावर असलेल्या पूर्व खासी टेकड्यांमध्ये मावसिनराम गाव असल्याने येथे मुसळधार पाऊस पडतो.

नैऋत्य मान्सूनमध्ये या टेकड्या पावसाळी ढगांना अडवतात, यामुळे मुसळधार पाऊस पडतो.

मावसिनराम आणि चेरापुंजीमध्ये लोक बांबूपासून बनवलेल्या छत्र्यांचा वापर करतात, याला कानुप म्हणतात. मावसिनरामची सुपीक जमीन चहा आणि संत्री यासारख्या पिकांसाठी अतिशय योग्य आहे.

Click Here