लग्नातली शेरवानी कुठून आली...? तुम्ही मिरवलात ती काही वर्षांपूर्वी पहायलाही मिळत नव्हती...
भारतीय विवाह सोहळ्यात शेरवानी ही नवरदेवासाठी फेवरेट गोष्ट.
या शेरवानीसाठी काही हजार, लाख रुपये आपापल्या ऐपतीप्रमाणे मोजले जातात.
या शेरवानीचा प्रवास तुम्हाला माहिती आहे का? ९० काय ९९.९९ टक्के लोकांना याबाबत माहिती नसणार...
शेरवानी हा शब्द पर्शियन शब्द शेरवानपासून घेतला गेला आहे.
अझरबैजानमध्ये बनविलेले कोट त्याकाळी खूप प्रसिद्ध होते. तेव्हा लोक शेरवानी नाही तर कोट वापरायचे.
तेव्हा मुगल, इंग्रज लांब कोट घालायचे. जे पुढून उघडे असायचे. भारतीय कपड्यांवर मग पारशी पोशाखाचा प्रभाव पडला.
या सर्वात लांब कोटांपासून मग शेरवानी बनविण्यात येऊ लागली आणि आता ती एवढी रुजली की लग्न समारंभांत राजेशाही थाटासाठी ती वापरली जाऊ लागली.
पूर्वी फक्त जमीनदार, नवाब आणि राजेच ही शेरवानी वापरत होते. आता त्यांचा काळ गेला आणि नंतर नेत्यांनीही वापरायला सुरुवात केली.
आता हे सर्व श्रीमंत लोक असल्याने त्यांची शेरवानी सोन्या, चांदीच्या धाग्यांपासून बनविली जायची. पण हळूहळू शेरवानीचा ट्रेंड बदलला.