हसताना डोळ्यात पाणी यायच काय कारण?

खूप जास्त हसल्यावर डाेळ्यातून घळाघळा पाणी येतं. रडताे आहे की काय, असं वाटावं इतक. पण हे अश्रू वेग वेगळे असतात, हे माहिती आहे का?

हसणे म्हणजे आनंद, उत्साह असताे. मग अशा वेळी, खळखळून हसल्यानंतर डाेळ्यातून अश्रू का बरं येतात? यामागे विज्ञान लपलेलं आहे.

आपल्या चेहऱ्यावर एक स्नायू असतो orbicularis oculi. हसताना हा स्नायू इतका आकुंचन पावतो की डोळ्यांवर दाब पडतो.

हा दाब आपल्या डोळ्यांतील lacrimal gland म्हणजेच अश्रुग्रंथीं वर पडताे. यामुळे अश्रूग्रंथी पाणी (अश्रू) बाहेर ढकलतात.

खळखळून हसताना आलेले अश्रू म्हणजे आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंचा side effect आहे. 

हसताना डाेळ्यातून पाणी येण्याचे हे एकच कारण नाही. हास्यामुळे आपल्या autonomic nervous system मध्ये बदल होतो.

खूप हसलं की शरीराला थोडं stress सारखं वाटतं. त्यामुळे डोळे ओले होतात. हे शरीराचा release mechanism आहे.

शास्त्रज्ञ म्हणतात, हसताना आलेले अश्रू शरीराचं emotional overflow म्हणजे आनंदाचा ओघ इतका जास्त की डोळ्यांतून पाणीच येतं. 

म्हणूनच हसताना डोळ्यातलं पाणी ही केवळ शारीरिक क्रिया नाही, तर भावनांचं प्रतिबिंब आहे.

Click Here