खूप राग आला... १ मिनीट थांबा!

खूप जास्त राग आल्यावर १ मिनिटांचा ब्रेक घ्यायलाच हवा. १ मिनिटं थांबलात तर नक्कीच फायदा हाेईल.

अनेकदा रागाच्या भरात केलेल्या गाेष्टींचा नंतर पश्चाताप हाेताे. त्यामुळे प्राेब्लेम वाढलेला असताे. 

रागात असताना अनेकदा ताेंडातून चुकीचे शब्द बाहेर पडतात. यामुळे समाेरची व्यक्ती जास्त दुखावली जाते. 

रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी राेजच्या राेज प्रयत्न केला पाहिजे. पण, राग आल्यावर १ मिनिटं थांबायला शिका. 

राग आल्यावर काही सुचत नाही. मग, अशावेळी १ ते १०० आकडे म्हणा. राग कमी झाला नाही तर परत म्हणा. 

१ ते १०० आकडे माेजताना १ मिनिटाचा वेळ निघून जाताे आणि ताे क्षण आपण थांबताे, यामुळे बऱ्याच गाेष्टी बदलू शकतात. 

तुम्हाला नक्की कशाचा राग आला आहे, याचा विचार करा. नकारात्मक गाेष्टींकडे पाहण्यापेक्षा सकारात्मक गाेष्टींचा विचार करा. 

राग अनावर हाेऊ नये म्हणून आपल्या भावना व्यक्त करा. तुम्हाला काय वाटते आहे, ते शब्दात लिहून काढा. 

राग आल्यावर काेणताही निर्णय घेऊ नका. राग शांत झाल्यावर विचारपूर्वक निर्णय घ्या. 

Click Here