विमानाचे टायर किती जुने झाल्यावर बदलले जातात? जाणून घेऊया...
अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळून झालेल्या अपघातामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला.
या विमानात प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला सोडून बाकी सगळ्यांना दुर्दैवी मृत्यू आला.
या अपघातमुळे सगळ्याच विमानांबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
अनेक लोकांना आता विमानाच्या देखभालीवरून अनेक प्रश्न पडले आहेत.
यापैकीच एक मोठा प्रश्न म्हणजे विमानाचे टायर किती जुने झाल्यावर बदलले जातात?
विमानाचे टायर बदलण्याची वारंवारता विमान किती अंतर प्रवास करते यावर अवलंबून असते.
सामान्य विमानाचा टायर सुमारे १५० ते ४०० लँडिंगपर्यंत टिकू शकतो.
यानंतर सहसा विमानाच्या टायरचा वरचा पृष्ठभाग बदलला जातो.
विमानाच्या टायर्सचे आयुष्य विमानाच्या प्रकार, वापर आणि देखभालीनुसार बदलू शकते.