माणसानं सर्वात आधी कोणता प्राणी पाळला असेल तर तो आहे श्वान!
माणसानं सर्वात आधी कोणता प्राणी पाळला असेल तर तो आहे श्वान! आता हा श्वान माणसांसोबत कधीपासून राहायला लागलाय याबाबत मत मतांतर आहेत.
काहींच्या मते श्वान अन् माणसांचं नातं ४० हजार वर्षे जुनं आहे. मात्र पुराव्यानिशी बोलायचं झालं तर श्वान अन् मानसांचं सहअस्तित्व हे साधारणपणे १४ हजार वर्षापासून सुरू आहे.
याचा पुरावा जर्मनीमधील बॉन ओबरकासेल इथं आढळून येतो. इथं माणसांसोबत श्वानाला देखील दफन केल्याचे १४ हजार वर्षापूर्वीचे पुरावे मिळाले आहेत.
तसं काही डीएनए अॅनलिस्ट सैबेरियामध्ये २३ हजार वर्षापूर्वीपासून माणूस कुत्रा पाळतोय असा दावा करतात.
माणूस जसजसा स्थलांतर करत गेला तसतसे श्वान देखील जगभरात पसरत गेलेत.
तसंच १२ हजार वर्षापूर्वी Ain Mallaha इथं माणसांना त्यांच्या श्वानासोबत दफन केल्याचे पुरावे देखील सापडले आहेत. यावरून माणूस आणि श्वान यांच्यातील बंध दिसून येतो.
अमेरिकेतील इडाहो येथील जाग्वार केव्हमध्ये सापडलेल्या हाडांच्या अवशेषावरून श्वान हे माणसांची राहण्याची जागा गेल्या ११ हजार वर्षांपासून शेअर करत असल्याचं दिसून येतं.
आता आपल्याला माणसानं श्वानाला पाळायला का सुरू केलं असा प्रश्न पडला असेल. तर सुरूवातीला हे नातं लांडगे मानवी वस्तीच्या जवळ अन्न शोधण्यातून सुरूं झालं असा विचार मांडण्यात आला.
काही धाडसी, अधिक सोशल झालेले श्वान मानवी वस्तीत मिसळून गेले असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कालांतरानं हे श्वान माणासोबतच राहू लागले, शिकारीत मदत करू लागले अन् माणसाळले.
काही मानसशास्त्रीय अभ्यासात श्वान पाळण्यानं फायदा होत असल्याचा दावा केला आहे. श्वान पाळण्यानं बाँडिंग हार्मोन्स वाढतात असं अभ्यासात दिसून आलं आहे.