"कुर्बानीचा अर्थ फक्त बकरा कापणे नाही"

नेमकं काय म्हणाला होता इरफान खान?

इरफान खान आज जरी आपल्यात नसला तरीही त्याचे सिनेमे आजही आवडीने पाहिले जातात.

 इरफान उत्तम अभिनेता होताच शिवाय माणूस म्हणूनही संवेदनशील होता.

एकदा त्यानं मुस्लिम धर्मातील 'कुर्बानी' प्रथेवर भाष्य करताना मुस्लिम नेत्यांनाही फटकारलं  होतं. 

"हल्ली लोक 'कुर्बानी'चा अर्थच विसरून गेले आहेत. बाजारातून दोन बकरे विकत आणून ते कापणं याला कुर्बानी म्हणत नाहीत. स्वत:च्या प्रिय वस्तूचा त्याग करण्याला कुर्बानी म्हणतात" असं इरफान खाननं म्हटलं होतं.

'मदारी' चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी जयपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्यानं हे वक्तव्य केलं होतं. 

इरफान खानच्या या वक्तव्यावरुन खूप टीका झाली होती. मुस्लिम मौलवींनी आक्षेप घेत त्याच्याकडून माफीची मागणीही केली होती. 

दरम्यान, इरफानचं २०२० ला कॅन्सरने निधन झालं होतं. इरफानचा लेक अर्थात बाबील खान सध्या बॉलिवूडमध्ये सक्रीय आहे. 

Click Here