'गहू' भारतीय नाही, मग कुठून आला?

गहू या धान्याचा इतिहास तब्बल १० हजार वर्षे जुना आहे. 

गहू आपल्या आहारचा महत्त्वाचा भाग आहे. हे पीक देशातील सगळ्यात जुन्या धान्यांपैकी एक आहे. 

भारतात गहू मोठ्या प्रमाणावर पिकावले जातात. पण, गहू भारतीय नाही! तो कोणत्या देशातून आलाय तुम्हाला माहितीये का?

गहू या धान्याचा इतिहास तब्बल १० हजार वर्षे जुना आहे. 

गव्हाची उत्पत्ती ही फर्टाईल क्रेसेंट या भागात झाल्याचे मानले जाते.

या भाग सध्या इराक, सीरिया, तुर्की आणि इराण या ठिकाणी पसरलेला आहे. 

म्हणजेच गव्हाची पहिली शेती ही पश्चिम आशियातून सुरू झाली आहे. हळूहळू ती भारत, चीन, युरोपमध्ये पसरली. 

भारतात गव्हाची शेती हजारो वर्षापूर्वी सुरू झाली. इथले हवामान गव्हासाठी अतिशय अनुकूल आहे. 

यामुळेच भारत हा जगातील गहू उत्पादकांपैकी एक महत्त्वाचा देश आहे. 

भारतात गव्हाच्या लागवडीची सुरुवात सिंधू संस्कृतीच्या काळापासून झाली असे मानले जाते.

पुरातत्वीय उत्खननात हडप्पा आणि मोहेंजोदारो येथील गव्हाच्या धान्याचे पुरावे मिळाले आहेत.

Click Here