WhatsApp ची ही सेटींग लगेच बदला; नाहीतर स्टोरेज भरेल

WhatsApp आता आपल्या जीवनातील महत्वाचा घटक बनले आहे. 

तुम्ही जर WhatsApp वापरत असाल तर अॅपमधील सर्व फिचरची माहिती असणे महत्वाचे आहे.

WhatsApp मध्ये मिडिया व्हिजिबिलिटी नावाचे एक फिचर आहे, हे फिचर स्टोरेज लगेच फुल्ल करते.

मीडिया व्हिजिबिलिटी फिचरमुळे, फोनवर आलेले फोटो आणि व्हिडीओ आपोआप डाउनलोड होतात, यामुळे फोनचे स्टोरेज फुल्ल होते.

स्टोरेज वाचवण्यासाठी WhatsApp मीडिया व्हिजिबिलिटी फिचर बंद करा.

WhatsApp सेटिंग्जमध्ये, चॅट्स पर्यायातील मीडिया व्हिजिबिलिटी फीचरवर क्लिक करा, तुम्ही येथून हे फीचर लगेच बंद करू शकता.

वैयक्तिक चॅटसाठी मीडिया व्हिजिबिलिटी फिचर बंद करण्याचा पर्याय देखील आहे.

ज्या चॅटमध्ये बदल करायचे आहे ते ओपन करा, दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर क्लिक करा आणि मीडिया व्हिजिबिलिटी सेटिंग बंद करा.

Click Here