WhatsApp आता फक्त एक खाजगी मेसेजिंग अॅप राहिलेले नाही, मेटा याकडे बिझनेस म्हणून पाहत आहे.
युजर्सना त्यांच्या व्हॉट्सअॅप प्लॅटफॉर्मवर देखील स्क्रोल करताना जाहिराती पाहण्याची सवय लावावी लागणार आहे.
मेटाने व्हॉट्सअॅपवर जाहिराती सुरू करण्याची योजना आखली आहे, ज्यामुळे भविष्यात या प्लॅटफॉर्मवर एक मोठा बदल दिसून येईल.
व्हॉट्सअॅप आता स्टेटस टॅबमध्ये जाहिराती दाखवण्यास सुरुवात करणार आहे. याद्वारे, युजर्सना नवीन व्यवसाय शोधण्याची आणि त्यांच्याशी थेट चॅट करण्याची संधी मिळेल.
फेसबुक आणि इंस्टाग्राम प्रमाणेच Ads Manager जाहिराती तयार केल्या जाऊ शकतात. लाईव्ह होण्यापूर्वी त्यांचा रिव्हू घेतला जाईल.
टार्गेटसाठी देश, शहर, भाषा, फॉलो केलेले चॅनेल आणि युजर्स चॅट यासारख्या मर्यादित डेटाचा वापर केला जाईल. यामुळे अधिक स्थानिक जाहिराती दिसतील.
व्हॉट्सअॅप हे व्यवसायांसाठी आधीच एक यशस्वी प्लॅटफॉर्म आहे, जिथे लाखो कंपन्या त्यांच्या ग्राहकांशी बोलत आहेत.
यामध्ये प्रमोट केलेले चॅनेल वर दाखवले जातील. तर अॅडमिन त्यांच्या फॉलोअर्सना विशेष सामग्री प्रदान करून कमाई करू शकतील.
व्हॉट्सअॅप खाजगी आणि सुरक्षित कम्युनिकेशशी तडजोड न करता ते जाहिराती आणि कमाईकडे वळले आहे.