टॉप १० EV कारची ट्रू रेंज किती? सांगतात एक...

कंपन्या सांगतात एक, कार एका चार्जमध्ये जाते त्यापेक्षाही खूप कमी, घेऊन पस्तावण्यापेक्षा...

टाटा असुदे की एमजी की आणखी कोणती ईव्ही वाहन निर्माता कंपनी, ते सांगत असलेली रेंज कधीच मिळत नाही. 

सर्व कंपन्या आपली कार किती रेंज देते याचे आकडे देत असते, ते एआरएआयचे असतात. रिअल नाहीत. 

यामुळे लोकांना इलेक्ट्रीक कार घेतली खरी रेंज किती देते, याची एंझायटीच जास्त असते. ऑटोकार इंडियाने टॉप १० कारची खरी रेंज किती आहे ते काढले आहे. 

टाटा नेक्सॉन ईव्हीच्या ४०.५ किलोवॅट बॅटरीची खरी रेंज २७३ किमी आणि ४५ किलोवॅट बॅटरीची रेंज ३५० किमी पर्यंत मिळते. 

एमजी विंडसर ईव्हीची ट्रू रेंज ३०८ किमी पर्यंत आहे. विंडसर ईव्ही प्रो मॉडेलची प्रत्यक्ष रेंज अद्याप समोर आलेली नाही. 

टाटा पंच ईव्हीची ३५ किलोवॅट बॅटरीची खरी रेंज २२९ किमी पर्यंत आहे. कंपनी  ३६५ किमीचा क्लेम करते. 

महिंद्राच्या एसयूव्ही बीई ६ ची ७९ किलोवॅट क्षमतेच्या बॅटरी पॅकची चाचणी केलेली खरी रेंज ४४९ किमी आहे, कंपनी  ६८२ किमीचा दावा करते. 

महिंद्राच्या XUV400 ची 39.4 kWh बॅटरीची खरी रेंज 251 किमी आहे.

एमजी कॉमेट ईव्हीची खरी रेंज १९३ किमी पर्यंतच आहे. कंपनी २३० चा दावा करते. 

टाटाच्या कर्व्ह ईव्हीची ५५ ​​किलोवॅट बॅटरीची रेंज ३६५ किमी एवढीच आहे. कंपनी ५०२ किमीचा दावा करते. 

एमजीच्या ZS EV ची खरी रेंज 339 किमी आहे, कंपनी 50.3 kWh बॅटरीसाठी 461 किमीचा दावा करते. 

टियागो ईव्हीची खरी रेंज १८७ किमी पर्यंत मिळते, कंपनी २७५ किमीचा दावा करते. 

सिट्रोएन सी ३ ईव्हीची प्रत्यक्षातील रेंज ही 228 किमी आहे, कंपनी 29.2 kWh बॅटरीसाठी 246 किमी दावा करते.

Click Here