WhatsApp Call करता येईल रेकॉर्ड, वापरा 'ही' ट्रिक

काही ट्रिक्स वापरल्या तर WhatsApp चे कॉल सुद्धा रेकॉर्ड होऊ शकतात.

WhatsApp कॉल्समध्ये एंड टू एंड एन्क्रिप्शन वापरल्यामुळे प्रत्येकाचे कॉल्स हे सुरक्षित ठेवले जातात. ज्यामुळे कोणताही व्हॉट्स अॅप कॉल आपल्याला रेकॉर्ड करता येत नाही.

 Meta कंपनीनुसार जर कॉल रेकॉर्डिंगचा ऑप्शन दिला तर यूजर्सच्या गोपनीयतेवर परिणाम होऊ शकतो. याच कारणामुळे तुम्हाला WhatsApp च्या सेटिंगमध्ये कॉल रेकॉर्डिंगचा पर्याय मिळत नाही. 

 काही ट्रिक्स वापरल्या तर WhatsApp चे कॉल सुद्धा रेकॉर्ड होऊ शकतात हे फार कमी जणांना ठावूक आहे. म्हणूनच, WhatsApp कॉल कसे रेकॉर्ड करायचे ते पाहुयात.

जर तुम्ही Android यूजर्स असाल तर WhatsApp कॉल रिकॉर्ड करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे स्क्रीन रेकॉर्ड करणं. फोनची स्क्रीन रेकॉर्ड झाली तर  WhatsApp कॉल आपोआप रेकॉर्ड होतो.

स्क्रीन रेकॉर्ड केल्यामुळे फोनची स्क्रीन आणि ऑडिओ दोन्ही रेकॉर्ड होतात. ज्यामुळे तुम्ही सहज WhatsApp कॉल रेकॉर्ड करु शकता.

असं केल्याने तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी अॅप्सची आवश्यकता नाही तसेच यामुळे तुमची प्रायव्हसी सुद्धा सुरक्षित राहील.

रेकॉर्डिंग दरम्यान कॉल स्पीकरवर ठेवल्याने अधिक स्पष्ट ऑडिओ मिळतो. 

चामखीळ घालवण्याचे घरगुती उपाय

Click Here