पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी घरगुती उपाय

अपुरी झोप, चुकीची आहारपद्धती यामुळे अनेकदा अपचन, पित्ताचा त्रास होतो. 

अपुरी झोप, चुकीची आहारपद्धती यामुळे अनेकदा अपचन, पित्ताचा त्रास होतो. हा त्रास वारंवार होत असेल तर त्यावर घरगुती उपाय कोणते करता येतील ते पाहुयात.

कफ आणि पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी आवळा सर्वोत्तम पर्याय आहे. आवळ्यामध्ये व्हिटामिन सी असल्यामुळे पोट साफ होतं. तसंच पित्ताचा त्रासही कमी होतो.

जर तुम्हाला पित्त झाल्याने जळजळ होत असेल तर मुगाचं साधं वरण आणि भात यांचं सेवन करा. सोबतच तूपही त्यात अॅड करा. मूग पित्तशामक आहे. 

आलं किसून त्यावर मीठ, लिंबाचा रस आणि साखर घाला. त्यानंतर हे चाटण थोड्या थोड्या अंतराने चाखत रहा.

पित्त झाल्यास आमसूल खा किंवा कोकम सरबत प्या. यामुळे पित्त शमतं.

पित्त झाल्यावर जळजळत असेल तर थंडगार दूध प्या.

मर्चंट नेव्हीमध्ये करिअरसाठी कोणती शैक्षणिक पात्रता लागते?

Click Here