फोन पावसात भिजला की काय करायचं, जाणून घ्या
फोनवर पाणी पडलं, तो पावसात भिजला की सर्वात आधी स्विच ऑफ करा. सिम, मेमरी कार्ड, कव्हर काढा.
ओला झालेला फोन हलवल्यास पाणी जास्त आत जाऊ शकतं. त्यामुळे तो स्थिर ठेवा.
एखाद्या मऊ कपड्याने फोन हलका पुसून घ्या, जोरात पुसल्यास स्क्रिन किंवा पार्ट्सचं नुकसान होऊ शकतं.
सिलिका जेलचं पॅकेट्स असतील तर फोन त्यासह एअरटाईट बॅगमध्ये २४ ते ४८ तास ठेवा. ओलावा निघून जाईल.
फोन ओला झाला की, तो तांदळाच्या डब्यात ठेवतात. यामुळे ओलावा थोडा कमी होतो. पण फोनच्या चार्जिंग पोर्टमध्ये तांदूळ अडकू शकतात.
फोन सुकण्यासाठी वेळ लागतो. कमीत कमी २४ ते ४८ तास चालू करू नका, अन्यथा फोन खराब होऊ शकतो.
फोन सुकल्यानंतरही सुरू होत नसेल तर स्वत: तो उघडण्याचा प्रयत्न करू नका. सर्व्हिस सेंटरशी संपर्क करा.