जर दही आंबट झालं तर सगळेच पदार्थ फिस्कटतात.
शरीरासाठी बहुगुणी असलेला पदार्थ म्हणजे दही.
दह्यापासून अनेक वेगवेगळे पदार्थ केले जातात. परंतु, जर दही आंबट झालं तर सगळेच पदार्थ फिस्कटतात.
जर दही आंबट झालं असेल तर त्याचा आंबटपणा कमी करायच्या काही टिप्स पाहुयात.
दही आंबट झालं तर त्यात ४-५ मनुका टाकून हे मिश्रण २-३ तासासाठी ठेऊन द्या. दह्याचा आंबटपणा आपोआप कमी होईल.
दह्यामध्ये थंडगार दूध घालावं. यामुळे आंबटपणा कमी होतो.
दह्यामध्ये पिठीसाखर घालून त्याचा आंबटपणा बॅलेन्स करता येऊ शकतो.