विषारी साप चावल्यावर काही वेळातच मृत्यू होऊ शकतो.
साप हा जगभर आढळणारा प्राणी आहे.
भारतात ९५ टक्के साप विषारी नसतात.
पण, काही साप विषारी आहेत, ज्यांचा चावा प्राणघातक ठरू शकतो.
साप चावल्यावर सर्वप्रथम त्या व्यक्तीला शांत ठेवा आणि सापापासून दूर घेऊन जा.
नंतर साप चावलेल्या जागेची पाणी आणि साबणाने साफसफाई करा.
चावलेल्या भागाला शरीराच्या पातळीपेक्षा खाली ठेवा आणि तो भाग जास्त हलवू नका.
यामुळे सापाचे विष शरीरात पसरण्यापासून रोखले जाईल.
नंतर त्या व्यक्तीला ताबडतोब रुग्णालयात घेऊन जा आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार घ्या.