PCOS शी लढणारी सारा अली खान mental health साठी काय करते?
चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी साराला खूप हेल्थ इश्यूज होते.
सारा अली खाननं बॉलीवूडमध्ये आपला चांगलाच जम बसवला आहे. सध्या ती आघाडीची युवा अभिनेत्री म्हणून पुढं येत आहे.
मात्र चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी तिला खूप हेल्थ इश्यूज होते. तसंच आता कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळं शारिरीक आणि मानसिक दोन्ही पातळीवर लढावं लागतं.
त्यातच सारा अली खान ही PCOS अर्थात पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम या हार्मोनल डिसऑर्डरने देखील त्रस्त होती. त्यामुळं वजन वाढणं, अॅकने, मधुमेहाचा होण्याचा धोका होता.
मात्र यावर सारा अली खाननं मात केली आहे. ती मानसिक ताण नियंत्रणासाठी ध्यानधारणा आणि श्वसनाची आसने करते.
तसंच विचार आणि भावनांना नियंत्रित करण्यासाठी जर्नलिंगचा देखील वापर करते. यात ते विचार भावना लिहून ठेवले जातात. यामुळं स्वतःचा शोध घेता येतो.
अती ताणामुळं बर्नआऊट व्हायला होतं. मात्र यावर उपाय म्हणून सारा स्वतःची काळजी घेणं अन् बाऊंड्री निश्चिती करण्याला प्राधान्य देते.
त्याचबरोबर मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी चांगलं खाणं देखील गरजेचं असतं. सारा अली खानला याची जाणीव आहे. त्यामुळे ती संतुलित आहार घेते.
याचबरोबर सारा नियमित व्यायामाला देखील प्राधान्य देते. त्यामुळे तिची शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्य सुधारण्यास मदत होते.
सारा सांगते आव्हानात्मक काळात स्वतःवर प्रेम आणि सकारात्मकता या दोन गोष्टी महत्वाच्या असतात. सारा ट्रोलिंगचा स्वतःवर जास्त परिणाम न होऊ देता योग्य प्रतिक्रियांचा स्विकार करण्यावर भर देते
साराला पुस्तकं वाचणे, प्रवास करणे आवडते, याद्वारे ती स्वतःला रिचार्ज करते. तसेच ती भावनिक आधार आणि आनंदासाठी कुटुंब आणि मित्रांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करते.