'ईव्ही'चा इन्शुरन्स घेताना या बाबी नक्की तपासून पाहा
ईव्ही विम्यांच्या विक्रीत गेल्या तीन वर्षांत १६ पट वाढ झाली आहे.
जसजशी भारतात इलेक्ट्रिक वाहनांसाठी मागणी वाढत आहे, तसतशी या गाड्यांसाठी विमा घेणाऱ्यांचे प्रमाणही वाढलं आहे.
पॉलिसीबझारच्या आकडेवारीनुसार ईव्ही विम्यांच्या विक्रीत गेल्या तीन वर्षांत १६ पट वाढ झाली आहे. २०२३ मध्ये हा हिस्सा अवघा ०.५ टक्के इतका होता. २०२४ मध्ये हा वाटा १४ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो
ईव्ही घेताना बॅटरी डॅमेज, शॉर्ट सर्किट, चार्जिंगदरम्यान आग लागणे इत्यादी धोके असतात. विमा घेताना या धोक्यांचा विचार जरूर केला पाहिजे.
कंपन्यांनी आता त्यानुसार पॉलिसी डिझाइन केल्या आहेत. काही कंपन्यांनी ईव्ही शिल्ड अॅड-ऑन सुरू केले आहेत ज्यात बॅटरी तसेच चार्जरशी संबंधित समस्यांना संरक्षण दिले जाते.
ईव्ही कार व ई बाईकसाठी झिरो डिप्रिसिएशन, रोडसाइड असिस्टन्स, बॅटरी प्रोटेक्शन व चार्जर कव्हरसारखे अॅड-ऑन गरजेचे आहेत.
हे अॅड-ऑन सामान्यतः चोरी किंवा आग लागण्याच्या घटनांमध्ये मदतीचे ठरतात. विमा प्रीमियम पेट्रोल गाड्यांसारखाच असतो, हे लक्षात ठेवावे.
ईव्हीच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा प्रीमियम आकारला जात असेल सावध राहावे.