पीसीओएस ही एक अनुवांशिक आणि हार्मोनल असंतुलनामुळे निर्माण होणारी समस्या आहे.
सध्याच्या काळात तरुणींमध्ये 'पीसीओएस' ही एक समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
पीसीओएस ही एक अनुवांशिक आणि हार्मोनल असंतुलनामुळे निर्माण होणारी समस्या आहे. या आजाराला पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम असं म्हणतात.
अनेकदा ही समस्या निर्माण होण्यापूर्वी त्याची काही लक्षण स्त्रियांना जाणवत असतात. मात्र, हीच खरी पीसीओएसची लक्षणं आहेत हे फारसं लक्षात येत नाही.
किरकोळ वाटणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं जातं आणि नंतर ही समस्या त्रासदायक ठरते. त्यामुळे पीसीओएसची नेमकी लक्षणं कोणती ते पाहुयात.
PCOS असलेल्या स्त्रियांच्या अंडाशयाला सूज येते. त्याचसोबत परिपक्व बीजदेखील तयार होत नाही.
PCOS चं सगळ्यात मोठं लक्षण म्हणजे अनियमित मासिक पाळी. तसंच चेहऱ्यावर आणि अंगावर पुरळ येण्यास सुरुवात होणे.
अनेक स्त्रियांना PCOS झाल्यावर लठ्ठपणाचाही सामना करावा लागतो.