असे काही पदार्थ आहेत जे भेंडीसोबत चुकूनही खाऊ नयेत.
प्रत्येक घरात भेंडीची भाजी कायमच केली जाते. यात अनेकांनी ही भाजी आवडते तर काहींना नाही.
भेंडीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ केले जातात. प्रत्येक भागात, प्रांतात तिच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत.
आज आपण असे काही पदार्थ पाहुयात. जे भेंडीसोबत चुकूनही खाऊ नयेत.
भेंडीसोबत कधीही दुधाचं सेवन करु नये यामुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता असते.
भेंडीसोबत कधीही आम्लयुक्त पदार्थ म्हणजेच दही, लिंबू, टोमॅटो यांचं सेवन करु नये.
भेंडी आणि कारलं एकत्र खाऊ नये. कारलं उष्ण प्रकृतीचं आहे तर भेंडी थंड. या दोघांचं एकत्र सेवन केल्यामुळे पोटासंबंधित तक्रारी होऊ शकतात.