सतत मोबाईलवर असणारी मुलं करतात काय?
मुलांचा स्क्रीनटाइम वाढला आहे, हे खरंच; पण मुलं स्क्रीनवर नेमकं काय पाहतात?
हल्ली तर चालणं-बोलणं शिकायच्या आधीच मुलांच्या हाती मोबाइल आलेला असतो.
वय वाढत जातं, तसा त्यांचा स्क्रीनटाइमही वाढत जातो. याबद्दलचं द कॉमन सेन्स सेन्सस २०२५ च्या रिपोर्टमध्ये काही गोष्टी अधोरेखित करण्यात आल्या आहेत.
आठ वर्षे वयाच्या आतील मुलांचं व्हिडीओ, टीव्ही पाहण्याचं प्रमाण तब्बल ६० टक्के आहे. मुलांचं व्हिडीओ गेम पाहण्याचं, खेळण्याचं प्रमाणही २६ टक्के आहे.
मुलं मोबाईला होमवर्क (अभ्यासाठी) वापर किती करतात, तर एक टक्का. सोशल नेटवर्किंगसाठी २ टक्के.
वाचनासाठी स्क्रीनचा वापर करण्याचे प्रमाण ४ टक्के आहे, तर व्हिडीओ चॅटिंगसाठी ४ टक्के वापर होतो.