काय असतो थर्ड पार्टी कार इन्शुरन्स? 'असा' करायचा क्लेम
मोटार वाहन कायदा १९८८ नुसार भारतात सर्व वाहन धारकांना थर्ड पार्टी कार विमा बंधनकारक आहे
कार अपघातात एखाद्या तिसऱ्या व्यक्तीला झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी घेतलेल्या विम्याला थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणतात
भविष्यात वाहनामुळे इतर कोणत्याही व्यक्तीचे, वाहनाचे किंवा वस्तूंचे नुकसान झाले तर मालक विम्याच्या या रकमेतून नुकसान भरपाई देऊ शकतो
कारमुळे झालेले इतरांचे नुकसान, व्यक्ती जखमी होणे, दिव्यांग होणे, एखाद्याचा मृत्यू होणे या सर्व गोष्टींचा थर्ड-पार्टी विम्यात समावेश असतो
एखाद्या २ कारची टक्कर झाली तर संबंधित कारमालक कार इन्शुरन्समधून नुकसान भरपाई देतील की थर्ड पार्टी इन्शुरन्समधून रक्कम मागतील हे कोर्ट ठरवते
कोणाची चूक आहे हे न्यायालयाच्या निर्णयाआधारे ठरवले जाईल. जो दोषी असेल त्याने थर्ड पार्टी इन्शुरन्समधून पीडित व्यक्तीला पैसे देऊ शकतात
नियमानुसार, कारमुळे कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झाले तर तुम्ही थर्ड पार्टी इन्शुरन्स अंतर्गत जास्तीत जास्त ७.५ लाख रुपयांचा दावा करू शकता
जर एखाद्या कारचा अपघात झाला तर त्या कारचे झालेले नुकसान कोर्टाच्या निर्देशानुसार दुसऱ्या पक्षाकडून भरपाई केली जाईल परंतु एकावेळी २ इन्शुरन्सचा लाभ घेता येत नाही