भारत- पाक सीमारेषेची लांबी किती? 

अंतराळातूनही दिसते ही रेषा!

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमावाद जगभर परिचीत आहे. 

 ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. इंग्रज राजवटीतून भारत मुक्त झाला. मात्र, इंग्रजांनी ज्या भारतावर राज्य केलं, त्याचे दोन तुकडे झाले, म्हणजेच भारताची फाळणी झाली.

एक भारत आणि दुसरा भारतापासून वेगळा झालेला पाकिस्तान. 

दोन्ही देशांमध्ये नवीन सीमारेषा तयार करण्यात आली.

ही रेषा पंजाब, गुजरात, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या पाच भारतीय राज्यांमधून जाते.

या राज्यांतील सीमावर्ती भागांत अनेक लष्करी ठाण्या, सीमा सुरक्षा दलाचे तळ आणि बंकर आहेत. 

संपूर्ण सीमेवर भारतीय सीमा सुरक्षा दल (BSF) कडक देखरेख ठेवतात.

तर भारत आणि पाकिस्तानमधील एकूण सीमा सुमारे ३,३२३ किलोमीटर लांबीची आहे. 

भारत-पाकिस्तान सीमारेषा रात्री अंतराळातूनसुद्धा स्पष्टपणे दिसते. याचे कारण कारण तिथे फ्लडलाइट्स वापरल्या जातात.

Click Here