अमेरिकेत उभं राहिलं जन आंदोलन, नेमकं काय आहे कारण?
अमेरिकेतील "No Kings Protest" ही एक राष्ट्रीय स्तरावरील शांततापूर्ण निषेध मोहीम आहे, जी विविध सामाजिक संघटनांनी सुरू केली आहे
ही मोहीम प्रामुख्याने राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांविरोधात आहे. ट्रम्प प्रशासनाची वाटचाल हुकुमशाही असल्याचा आरोप लोकांनी केला आहे
जून २०२५ मध्ये सुरू झालेल्या या आंदोलनाने लाखो लोकांना रस्त्यावर आणले, जे ट्रम्प यांच्या वाढदिवसाच्या सैन्य परेडविरोधात आंदोलन करत होते
१८ ऑक्टोबर २०२५ रोजी नो किंग्स प्रोटेस्ट हे आंदोलन देशभरातील २,६०० हून अधिक ठिकाणी सुरू होते, ज्यात लाखो लोक सहभागी झाले
न्यूयॉर्क, वॉशिंग्टन डीसी, शिकागो आणि लॉस एंजेलिससारख्या मोठ्या शहरांबरोबरच छोट्या गावांपर्यंत हे आंदोलन पोहचले आहे
विशेष म्हणजे लाखोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले परंतु ही शांततापूर्ण आंदोलनामुळे कोणतीही मोठी हिंसा किंवा अटक घडली नाही
No Kings Protest ही अमेरिकन इतिहासातील सर्वात मोठ्या शांततापूर्ण निषेधांपैकी एक आहे. ज्यात लाखो लोकांनी सहभाग घेतला