चांगल्या आरोग्यासाठी महिलांची आदर्श कंबर किती असावी? अन् पुरुषांची...

एक नंबर तुझी कंबर हे गाणे सध्या खूपच लोकप्रिय झाले आहे. तो नंबर...

एखाद्या महिला किंवा पुरुषाची कंबर आणि त्याचे आरोग्य याचा संबंध आहे, असे सांगितले तर तुम्हाला खरे वाटणार नाही. 

एक नंबर तुझी कंबर हे गाणे सध्या खूपच लोकप्रिय झाले आहे. पण तुम्हाला तुमच्या कंबरेचा नंबर माहितीय का...?

तुम्हाला हेल्दी राहण्यासाठी वजनच नाही तर कंबरेची साईज देखील नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. 

जर तुमच्या कंबरेची साईज कमी-जास्त असेल तर त्याचा अर्थ तुमचे वजन वाढलेले आहे आणि तुम्ही कोणत्या ना कोणत्या आजाराने त्रस्त आहात. 

महिला असो की पुरुष, त्यांच्या कंबरेची साईज वाढली म्हणजे त्यांना रक्तातील चरबीचे प्रमाण वाढणे, उच्च रक्तदाब आणि मधुमेह यापैकी एकतरी आजार असतोच. 

वाढलेली पोटाची चरबी यकृतालाही व्यापते आणि त्यामुळे कोरोनरी हृदयरोगाचा धोका अनेक पटींनी वाढतो.

ब्रिटिश हार्ट फाउंडेशन नुसार आशियाई पुरुषांच्या कंबरेची साईज ही 35.4 इंच म्हणजेच ९० सेंटीमीटरच्या आतच असावी. त्याच्या बाहेर असली तर हाय रिस्क मानले जाते. 

भारतीयांची कंबर मोजायची असेल तर  सर गंगाराम हॉस्पिटलमधील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. श्रीहरी अनिखिंडी यांनी एक पद्धत सांगितली आहे. 

भारतातील लठ्ठपणा वेगळ्या प्रकारचा आहे. येथे पोटाजवळ जास्त चरबी जमा होते. यामुळे भारतीयांनी बेंबीजवळ कंबरेच्या थोडे वर कंबर मोजावी. 

तर भारतीय महिलांची योग्य कंबर साईज ही 80 सेंटीमीटर किंवा 31.5 इंचापेक्षा कमी असायला हवी. 

31.5 इंच ते 34.6 इंच यामध्ये जर महिलांची कंबर साईज असेल तर ब्रिटिश हार्ट फाउंडेशन नुसार ती हाय रिस्कमध्ये मोडते. 

चांगल्या आरोग्यासाठी कंबरेचे माप आणि उंची यांचाही एक रेशो असतो. कंबरेचा आकार उंचीच्या अर्ध्यापेक्षा कमी असावा लागतो. 

चला तर मग चांगल्या आरोग्यासाठी तुमची कंबर किती आहे, मोजपट्टी शोधा आणि कंबरेचा नंबर मोजायला घ्या... 

Click Here