जाणून घ्या नव्या ट्रेंडबद्दल...
एखाद्या लग्नाचं स्टेज असेल पण नवरा-नवरीच नसेल तर आश्चर्य वाटेल ना.. सोशल मीडियावरील याच नवीन ट्रेंडचं नाव - फेक वेडिंग पार्टी !
या पार्टीत खऱ्याखुऱ्या लग्नासारखा मंडप, बॅन्ड, डीजे, वरात सगळं असतं, पण हे लग्न खरं नसतं; केवळ पार्टीसाठी लग्नासारखी थीम असते.
फेक वेडिंगची एक पार्टी अरेंज केली जाते, मित्र-मैत्रिणी येतात, हळदी-संगीत होतं, पोज देऊन फोटोशूट होतं; सारं सोशल मीडियापुरतंच असतं.
हल्लीच्या जगात सोशल मीडियावर कंटेंटचा प्रभाव फार असतो. या कंटेंटसाठीच हा नवा ‘फेक वेडिंग पार्टीचा’ #FakeWedding ट्रेंड आला आहे.
पार्टीमध्ये ५०० रूपयापासून ते ३ हजारांपर्यंत पूर्ण लग्नाची पार्टी केली जाते. कपडे, मेकअप, स्टेज सारं खरं असतं पण केवळ मजामस्तीसाठी असतं.
फेक वेडिंग ट्रेंड तुम्हाला माहिती होता का? तुम्हालाही हा ट्रेंड अनुभवायला आवडेल का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा