Digital Detox ही आता काळाची गरज झाली आहे.
स्क्रीनवरून निळ्या प्रकाशाचे प्रमाण कमी झाल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते आणि मन शांत राहते.
सततच्या नोटिफिेकेशन आणि डिजिटल गोंधळामुळे होणारा मानसिक तणाव कमी होतो, मेंदूला विश्रांती मिळते.
डिजिटल डिटॉक्समुळे प्रत्यक्ष (face-to-face) संवाद वाढतो आणि कौटुंबिक, सामाजिक नातेसंबंध दृढ होतात.
स्क्रीन पासून दूर राहिल्यामुळे लक्ष केंद्रीत करता येते; पुस्तक वाचन, छंद जोपासणे किंवा घरातील कामे पूर्ण करताना उत्पादकता वाढते.
मेंदूवर असलेला माहितीचा भार कमी झाल्याने सर्जनशीलता वाढते आणि नव्या कल्पना सुचतात.
सतत स्क्रीन वापरामुळे डोळ्यांवर येणारा ताण कमी होतो, डोळे निरोगी राहतात.
ऑफलाइन राहिल्याने 'present moment' मध्ये जगण्याची कला विकसित होते, मन प्रसन्न राहते आणि मन लवकर थकून जात नाही.