चहा की कॉफी... नेमकं कधी पिणं योग्य? 

सकाळी आणि संध्याकाळी प्यायल्यास शरीरावर 'असा' होतो परिणाम

लोक चहा किंवा कॉफीने दिवसाची सुरुवात करतात. पण त्यांच्या मनात नेहमीच प्रश्न असतो की, या दोघांपैकी जास्त फायदेशीर काय आहे. 

सकाळी कॉफी पिणं हा दोघांपैकी एक चांगला पर्याय मानला जातो. त्यात चहापेक्षा जास्त कॅफिन असतं, ऊर्जा मिळते आणि आपण एक्टिव्ह राहतो.

उपाशी पोटी चहा किंवा कॉफीमुळे अ‍ॅसिडिटी, पोट फुगणे आणि गॅसची समस्या उद्भवू शकते. सकाळी नाश्त्यानंतर किंवा काहीतरी खाल्ल्यानंतरच चहा किंवा कॉफी प्यावी.

दिवसभर काम केल्यानंतर थकवा दूर करण्यासाठी लोक संध्याकाळी चहा किंवा कॉफी पिणं पसंत करतात. 

संध्याकाळी दुधाचा चहा किंवा हर्बल टी शरीराला आणि मेंदूला आराम देतो. त्यात कमी कॅफिन असतं. परंतु हळूहळू थकवा दूर होतो आणि चांगली झोप देखील येते.

जर तुम्हाला कॅफिनपासून दूर राहायचं असेल तर हर्बल किंवा ग्रीन टी या दोन्हीपेक्षा चांगली आहे. तुम्ही कधीही हर्बल किंवा ग्रीन टी पिऊ शकता. 

ग्रीन टी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ती शरीर डिटॉक्स करते, मेटाबॉलिज्म वाढवते आणि शरीराला ऊर्जा देखील देते.

Click Here