व्यायामाचा मानसिक आरोग्यावर काय होतो परिणाम? 

 नियमीत व्यायाम आणि मानसिक स्वास्थ यांचा परस्पर संबंध आहे. 

डॉ. राहुल चांधोक, ज्येष्ठ मानसशास्त्र तज्ञ यांनी सांगितलं की अनेक अभ्यासात असं दिसून आलं आहे, नियमित व्यायामामुळे मानसिक आरोग्य सुधारण्यास अनेक प्रकारे मदत होते.

मूड सुधारतो : व्यायामामुळे तुमच्या मेंदूमध्ये एंडॉर्फिन, डोपामाइन आणि सेरोटोनिन या नैसर्गिक रसायनांची निर्मिती होते, जे मूड सुधारतात आणि तणाव कमी करतात. 

ताण आणि नैराश्य कमी होणे : 
अभ्यास दर्शवितो की नियमित व्यायाम करणाऱ्या लोकांमध्ये ताण आणि नैराश्याची शक्यता कमी असते. व्यायामाने नकारात्मक विचार आणि तणावाचे हार्मोन नियंत्रित होतात.

झोप सुधारते : 
व्यायामामुळे मन शांत होते आणि अस्वस्थता कमी होते, ज्यामुळे चांगली आणि गाढ झोप मिळते. या झोपेमुळे लक्ष केंद्रित होतं, भावना नियंत्रित होतात आणि दिवसभर अधिक ऊर्जा मिळते.

मानसिक ताकद आणि शिस्त : 
व्यायाम पूर्ण करण्यासाठी स्वतःला प्रेरित केल्याने, केवळ शरीरिकच नाही तर मानसिक ताकदही वाढते. नियमित व्यायामामुळे मानसिक बळकटपणा, शिस्त आणि आत्मविश्वास वाढतो.

सामाजिक संबंध प्रस्थापित होणे : 
समुहाने केलेला व्यायाम, योग, खेळ किंवा मित्रांसोबत चालणे यामुळे सामाजिक नाते वाढते, ज्यामुळे लोकांना एकटेपणाचा त्रास कमी होतो, मानसिक आरोग्य सुधारते.

सुलभ आणि नैसर्गिक उपाय : 
व्यायाम हे स्वस्त, सोपे आणि नैसर्गिक आहे, त्यामुळे हे केवळ फिट राहण्याचे नाही तर एक शांत आणि भावनिकदृष्ट्या स्थिर व्यक्ती बनण्याचे माध्यम आहे.

Your Page!