महिनाभर भात सोडल्याने खरंच वजन होते कमी 

महिनाभर भात खाल्ला नाही तर त्याचा वजनावर कसा परिणाम होतो ते समजून घेऊयात.

'वजन कमी करायचं असेल तर प्रथम भात सोडा' असं सर्रास म्हटलं जातं. परंतु, खरंच जर महिनाभर भात खाल्ला नाही तर वजन कमी होतं का?

महिनाभर भात खाल्ला नाही तर त्याचा वजनावर कसा परिणाम होतो ते समजून घेऊयात.

जर तुम्हाला भात खाण्याची सवय असेल तर सुरुवातीला भात सोडतांना थोडा त्रास होऊ शकतो. परंतु, आहारात भात कमी केला तर नक्कीच त्याचे फायदे मिळतात.

ज्यावेळी तुम्ही भात खाणं बंद करता त्यावेळी तुमचं शरीर कमी कॅलरीज वापरतं. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.

भात खाल्ल्यामुळे सुस्ती येते आणि पर्यायाने झोपही येते.ज्यामुळे जेवल्यावर लगेच झोपलो तर वजन वाढतंच. हेच जर भात खाणं टाळलं तर आळस येत नाही. आणि, तुम्ही अॅक्टिव्ह राहता.

ज्यांना भात खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही अशांनी भाताला पर्याय म्हणून दलिया, ओट्स यांचं सेवन करावं.

पांढरा तांदूळ सहज पचतो आणि त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण जलद वाढते. महिनाभर भात टाळल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी अधिक स्थिर राहण्यास मदत होऊ शकते. 

जेवणानंतर लगेच चहा प्यावा का?

Click Here