रात्री चुकूनही झोपतांना घालू नका स्वेटर, नाहीतर...
हिवाळा सुरु झाला की वातावरणातील गारवा हळूहळू वाढू लागतो. त्यामुळे सहाजिकच थंडी वाढली की प्रत्येक जण स्वेटर, शाल यांचा आधार घेतांना दिसतात.
अनेक जणांना जराही थंडी सहन होत नाही. ज्यामुळे ते तिन्ही त्रिकाळ स्वेटर घालून बसतात. परंतु, जर तुम्ही रात्री झोपतांनाही स्वेटर घालत असाल तर वेळीच थांबा.
बरेच जण रात्री थंडी वाजते म्हणून स्वेटर घालून झोपतात. परंतु, असं करणं आरोग्यासाठी घातक आहे.
थंडीमध्ये रात्रीच्या वेळी आपल्या शरीराचं तापमान १८ ते २१ डिग्रीपर्यंत असतं. पण जेव्हा आपण स्वेटर घालून झोपतो तेव्हा तापमान अधिक वाढतं. ज्यामुळे झोपेत अडथळा येतो.
अनेकदा स्वेटर सतत घातल्यामुळे शरीरावर खाज किंवा रॅशेज येऊ शकतात. तसंच सतत जाड कपडे घातल्यामुळे शरीरातील घाम स्वेटरमुळे तसाच अंगावर राहतो. ज्यामुळे स्कीन इन्फेक्शनही होऊ शकतं.
गरम कपडे हे घट्ट विणलेले असतात. ज्यामुळे शरीराला हवा कमी मिळते. ज्यामुळे शरीराला नीट व्हेंटिलेशन मिळत नाही. ज्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो.
ज्या लोकांना बीपी आणि हृदयाचा त्रास असतो त्यांच्यासाठी रात्री गरम कपडे घालून झोपण सगळ्या घातक ठरतं. यामुळे अनेकदा बीपी फ्लक्चुएशनही होऊ शकतं.