रक्तातील साखर अचानक कमी झाल्यास काय होते जाणून घेऊया.
सध्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्यासोबतच ते कमी देखील होत आहे. या समस्येला हायपोग्लाइसेमिया असं म्हणतात.
रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यावर अशक्तपणा आणि थकवा येतो. ज्यामुळे चक्कर येऊ शकते.
रक्तातील साखर कमी झाली तर बोलण्यात अडचण येऊ बेशुद्ध देखील आपण होऊ शकतो.
आपल्याला मधुमेह असेल तर इन्सुलिन घेतल्याने रक्तातील साखर कमी होऊ शकते. यामुळे अशक्तपणा आणि थकवा येऊ शकतो.
वेळेवर न खाणे किंवा अपुऱ्या झोपेमुळे देखील रक्तातील साखर कमी होते.यासाठी आहारात फायबर आणि जीवनसत्त्व असणारे पदार्थ खा.
खूप जास्त व्यायाम केल्याने शरीरातील रक्तातील साखर कमी होऊ शकते. यामुळे चक्कर येते.
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण आहाराची विशेष काळजी घ्यायला हवी. नियमितपणे आरोग्याची तपासणी करायला हवी.
तसेच अल्कोहोल पिणे टाळा, ग्लुकोजयुक्त आहार घ्या, ताजी फळे खा. अचानक घाम किंवा हात-पाय थरथरत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.