वेळीच ओळखा ब्लड कॅन्सरची लक्षणे
गेल्या काही काळात ब्लड कॅन्सर आणि हार्ट अॅटकच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याचं दिसून येत आहे.
बदलती जीवनशैली, चुकीची आहार पद्धती, कामाचा ताण यांमुळे या गंभीर समस्या निर्माण होत आहेत.
ब्लड कॅन्सरमुळे आतापर्यंत अनेकांचे प्राण गेले असून या कर्करोगाची लक्षणे कोणती ती पाहुयात.
श्रमाची काम न करताही जर तुम्हाला वारंवार घाम येत असेल किंवा ताप येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. हे ब्लड कॅन्सरचं एक लक्षण आहे.
सतत थकवा किंवा अशक्तपणा जाणवणे.
भूक न लागणे, भूक मंदावणे किंवा जेवण पाहिलं की मळमळ होणे हे सुद्धा ब्लड कॅन्सरचं लक्षण आहे.
सांधेदुखी, पाठदुखी किंवा अचानक वजन कमी होणे.
डोकेदुखी, दम लागणे, त्वचेवर खाज किंवा पुरळ येणे.