आहारात नियमितपणे पोळीऐवजी भाकरी खाण्याचे फायदे कोणते ते पाहुयात.
'पोळीऐवजी भाकरी खा', असा सल्ला कायमच डॉक्टर आणि डाएटिशियन्सकडून दिला जातो.
विशेष म्हणजे आजची पिढी पुन्हा एकदा आपली जुनी आहारपद्धती फॉलो करतांना दिसत आहे. त्यामुळे अनेकांनी फास्टफूडला रामराम करत हेल्दी फूडला आपलंसं केलं आहे.
आज आपण आहारात नियमितपणे पोळीऐवजी भाकरी खाण्याचे फायदे कोणते ते पाहुयात.
शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक, कार्बोहायड्रेट्स याचं प्रमाण भाकरीमध्ये मुबलक प्रमाणात असतं.
भाकरी खाल्ल्यामुळे शरीराला पटकन ऊर्जा मिळते. तसंच पोट भरल्याची जाणीवही होते.
भाकरीचं पचन सहज होतं ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.
ज्वारीची भाकरी खाल्ल्यामुळे किडनी स्टोनचा त्रास कमी होतो.