झोप येत नसेल तर खा वेलची!

कोणताही गोडाचा पदार्थ हा वेलचीशिवाय अपूर्ण आहे.

मसाल्याच्या पदार्थांमधील राणी असा मान जिला मिळालाय ती म्हणजे वेलची.

कोणताही गोडाचा पदार्थ हा वेलचीशिवाय अपूर्ण आहे.

वेलचीमुळे पदार्थाची चव वाढते त्याचसोबत तिचे काही गुणकारी फायदेही आहेत.

अनेकदा काही खाल्ल्यावर त्याचे अन्नकण दातामध्ये अडकतात आणि तोंडाला घाण वास येतो. जर तोंडाची दुर्गंधी येत असेल तर वेलचीचं सेवन करा.

अनेकांना रात्री व्यवस्थित झोप लागत नाही. अशा वेळी झोपण्यापूर्वी वेलची चघळावी. वेलचीमध्ये असे काही घटक आहेत ज्यामुळे शरीरातील सेरोटोनिन वाढतं आणि झोप लागते.

अनेकांना उच्च रक्तदाबाची समस्या असते. अशावेळी वेलचीचं सेवन करावं. यामुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. तसंच रक्ताभिसरणदेखील व्यवस्थित होते.

वजन कमी करण्यासाठी वेलची उत्तम पर्याय आहे. वेलचीमधील अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर चयापचय वाढवतात, ज्यामुळे चरबी कमी होण्यास मदत मिळते.

पुऱ्या केल्यावर कडक-वातट होतायेत?; पुरी टम्म फुगण्यासाठी फॉलो करा या टीप्स

Click Here