जगातील सात आश्चर्य!

तुम्हाला ही सात आश्चर्य कोणती आहेत हे माहिती आहे का?

जगात सात आश्चर्य आहेत हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. पण, तुम्हाला ही सात आश्चर्य कोणती आहेत हे माहिती आहे का?

Great wall of China याविषयी सगळ्यांनाच ठावूक आहे. चीनमध्ये असलेली ही सर्वात मोठी भिंत जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे.

मॅक्सिकोमधील 'चीचेन इट्जा पिरॅमिड' जगातील ७ आश्चर्यांपैकी दुसरं आश्चर्य मानलं जातं. हे पिरॅमिड साधारण शंभर वर्षांपूर्वी बांधला गेल्याचं म्हटलं जातं.

तिसऱ्या आश्चर्यामध्ये जॉर्डनमधील 'पेट्रा' हे शहर मानले जाते. पेट्रा हे शहर प्राचीन असून ते दुर्गम दऱ्या, मोठमोठे पर्वत यांच्यामध्ये वसलेलं आहे.

पेरुमधील 'माचू-पिचू' हे शहर हे जगातील आश्चर्यामध्ये येते. समुद्रसपाटीपासून तब्बल ८,०००फूट उंचीवर हे शहर वसलेले आहे.

ब्राझीलमधील 'ख्रिस्त द रिडीमर पुतळा' हा पुतळा जगातील आश्चर्यापैकी एक आहे. हा स्टॅच्यू तब्बल ९८ फूट उंच असून या स्टॅच्यूचे हात ९२ फूट रुंद आहेत.

रोममधील 'कोलोझियम' हे जगातील आश्चर्यापैकी एक आहे. साधारण पहिल्या शतकात सम्राट वेस्पाशियनच्या आदेशानंतर ते बांधण्यात आलं होतं.

सात आश्चर्यापैंकी शेवटचे आश्चर्य 'ताज महाल' आहे. मुघल सम्राट शाहजहानने त्याची पत्नी मुमताज महलच्या स्मरणार्थ हा ताज महाल बांधला आहे.

ओला, उबर की रॅपिडो सगळ्यात स्वस्त सेवा कोण देत?

Click Here