हम दो, हमारे दो.. युवराज सिंगच्या मुलांना पाहिलं का?

युवराजच्या मुलांची नावं काय... माहितीये?

भारताचा 'सिक्सर किंग' युवराज सिंग नेहमी आपल्या क्रिकेटमधील कामगिरीमुळे चर्चेत राहिलाय. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी बोलले जाते.

युवराजने भारताला वर्ल्डकप जिंकवून दिल्यानंतर, त्याच्या कॅन्सरचे निदान झाले. पण इच्छाशक्तीच्या जोरावर तो कॅन्सरवर मात करून नव्या जोमाने उभा राहिला.

युवराजला कठीण काळात आधार मिळाला. तसेच इतर कॅन्सर पेशंट्सना आधार मिळावा म्हणून YouWeCan फाउंडेशन स्थापन केली आहे.

लंडनमध्ये फाउंडेशनचा एक चॅरिटी डिनरचा कार्यक्रम झाला, त्यात युवराज सहकुटुंब हजर होता. युवराज, त्याची पत्नी आणि दोन मुले यांनी छान पोज दिली.

युवराज सिंगची पत्नी हेजल किच ही एक अभिनेत्री आहे. सलमान खानच्या बॉडीगार्ड चित्रपटातील तिच्या अभिनयामुळे ती सर्वांना परिचीत आहे.

युवराजला दोन मुलं आहे. युवी-हेजल यांच्या मोठ्या मुलाचे ओरायन आहे. त्याचा जन्म २५ जानेवारी २०२२ ला झाला, तो सध्या साडेतीन वर्षांचा आहे.

युवराजच्या लहान मुलीचे नाव ऑरा आहे. तिचा जन्म २५ ऑगस्ट २०२३ ला झाला. ती लवकरच दोन वर्षांची होणार आहे.

सर्व फोटो- युवराज सिंग इन्स्टाग्राम

Click Here