सध्या सगळीकडे दिवाळीची धामधूम सुरु आहे.यात खासकरुन मुलांना वेध लागलेत ते फटाक्यांच्या खरेदीचे.
बाजारात विविध प्रकारचे फटाके उपलब्ध आहेत. परंतु,यात पुरेशी माहिती नसल्यामुळे आपण बनावट फटाके खरेदी करतो. आणि, त्यामुळेच पुढे श्वसनाचे त्रास वगैरे सुरु होतात.
सध्या green crackers घेण्यावर ग्राहकांचा अधिक भर आहे. green crackers म्हणजे ज्यामुळे धन्वी प्रदूषण आणि वायू प्रदूषण दोन्ही कमी होतं. यामध्येच ओरिजनल green crackers कसे ओळखायचे ते पाहुयात.
ओरिजनल फटाक्यांच्या पाकिटावर एक क्यूआर कोड असतो. हा कोड NEERI अॅपने स्कॅन केला तर त्या फटाक्याविषयी सगळी माहिती मिळते.
जर पाकिटावरील कोड स्कॅन केल्यानंतर कोणतीही माहिती येत नसेल. किंवा एरर दाखवत असेल तर ते फटाके बनावट आहेत.
green crackers मधून ११० ते १२५ डेसीबलचा आवाज होतो. हाच आवाज सामान्य फटाक्यांच्या तुलनेत खूप कमी आहे.
green crackers मध्ये डस्ट रिपेलेंट असतं. ज्यामुळे हा फटाका फुटल्यानंतर त्याचा धूर कमी होतो.
'स्लीप टुरिझ्म'! Gen-Z मध्ये लोकप्रिय होतोय ट्रॅव्हलिंगचा नवा ट्रेंड