बहुगुणकारी उंबर! किडनी स्टोनची समस्याही होईल दूर

उंबराच्या झाडाचे अनेक फायदे असून बऱ्याच शारीरिक व्याधींमध्ये त्याचा औषध म्हणून उपयोग केला जातो.

धार्मिक महत्त्व असलेलं औदुंबराचं म्हणजेच उंबराचं झाडं हे गुणकारी सुद्धा तितकंच आहे.

उंबराच्या झाडाचे अनेक फायदे असून बऱ्याच शारीरिक व्याधींमध्ये त्याचा औषध म्हणून उपयोग केला जातो.

अनेकदा उन्हाळ्यात घसा प्रचंड कोरडा पडतो. सतत जीव तहानतो. अशावेळी उंबराची फळं पाण्यात किस्करुन त्याचं सरबत प्यावं.

डांग्या खोकला झाल्यास उंबराचा चीक टाळूवर लावावा. यामुळे त्रास कमी होतो.

किडनी स्टोनची समस्या असेल तर उंबराच्या झाडाचा रस फायद्याचा ठरतो. उंबराच्या झाडाचा रस सकाळी प्यायल्यास किडनी स्टोन बरा होतो.

उंबर फळ दूधांत शिजवून खाल्ल्यास पचनसंस्था मजबूत होते. तसंच पोटाचे विकार, मळमळ, आम्लपित्त, पोटात आग होणे यांसारख्या समस्या दूर होतात.

(वरील माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

लहान बाळाला मध द्यावे का?

Click Here