१५ जणींनी केली होती नाव नोंदणी, पण फक्त एकटीचाच लागला नंबर
ऑस्ट्रेलियातील महिला बिग बॅश लीगच्या ११ व्या हंगामासाठी २३ आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या ड्राफ्टमध्ये फक्त एकमेव भारतीय महिला बॅटरचा समावेश आहे.
ऑस्रेलियन महिला बिग बॅश लीगच्या ड्राफ्टआधी १५ भारतीय महिला खेळाडूंनी नाव नोंदणी केली होती.
जेमिमा जेमिमा रॉड्रिग्जला ब्रिस्बेन हीट संघाने प्लॅटिनम या सर्वोच्च पगार श्रेणीसह आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.
जेमिमा रॉड्रिग्ज शिवाय ब्रिस्बेन हीटच्या संघाने वेस्ट इंडिजची चिनले हेनरी आणि दक्षिण अफ्रिकेच्या नादिन डी क्लार्क यांना पसंती दिली.
जेमिमा रॉड्रिग्ज आतापर्यंत WBBL मध्ये २४ सामने खेळली असून २४ डावात तिच्या खात्यात ६३९ धावांची नोंद आहे.
आतापर्यंत तिने या स्पर्धेत ३ अर्धशतके झळकावली आहेत. ऑस्ट्रेलियन महिला टी-२० लीगमध्ये ७५ धावा ही तिची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे.
Your Page!