Waves Summitसाठी आलियाने खास पैठणी साडीला पसंती दिली.
‘जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन’ (Waves) शिखर परिषदेचं आयोजन आज मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये करण्यात आलं.
या Waves Summitला आलिया भटनेही हजेरी लावली होती. यासाठी आलियाने खास पैठणी साडीला पसंती दिली.
आलियाने पैठणी साडीत मराठी लूक केला होता. तिने सहावारी पैठणीची नऊवारी साडी नेसली होती.
याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. आलियाच्या या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
केसाचा बन बांधून आणि कानात मोठे कानातले घालत तिने साधा आणि सिंपल लूक केला आहे.
हातात मोगऱ्याचा गजरा घेत तिने फोटोसाठी खास पोझही दिल्या आहेत.
आलियाचे हे फोटो चर्चेत आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.