सकाळी डोळ्यातून पाणी येणं आहे गंभीर आजाराचं लक्षण?
अनेकांची तक्रार असते की सकाळी उठल्यावर त्यांच्या डोळ्यातून अचानकपणे पाणी येतं.
जर डोळ्यात इन्फेक्शन होणे, अॅलर्जी, सूज किंवा अन्य कोणत्या समस्या असतील तर डोळ्यातून असं पाणी येऊ शकतं. त्यामुळे या समस्येकडे वेळीच लक्ष दिलं पाहिजे.
सर गंगाराम हॉस्पिटलचे माजी एचओडी डॉ. ए. के.ग्रोवर यांनी याविषयी भाष्य केलं आहे. डोळ्यात कोरडेपणा, पाळीव प्राण्यांचे केस, धूलीकण, मेकअपची अॅलर्जी यामुळेही डोळ्यातून पाणी येऊ शकतं.
रात्री झोपण्यापूर्वी डोळे स्वच्छ पाण्याने धुवा. तसंच स्क्रीन टाइम कमी करा.
घराबाहेर पडतांना चष्मा किंवा गॉगलचा वापर करा. डॉक्टरांच्या सल्ल्याने आयड्रॉप वापरा.
जपा हृदयाचं आरोग्य, ही लक्षण दर्शवतात नसांमधील ब्लॉकेज!