झोपेत अनेक स्वप्नं पडतात, त्यातली काहीच सत्यात उतरतात; मात्र काही स्वप्न आगामी काळाचे संकेत देणारी असतात.
स्वप्न शास्त्रानुसार पहाटेची स्वप्नं खरी होतात, पण केव्हा? जेव्हा ती जाग आल्यावर जशी च्या तशी आठवतात तेव्हा!
वाईट स्वप्न कोणाला सांगितले तर मन हलके होते, पण चांगले स्वप्न सत्यात उतरेपर्यंत कोणाला सांगू नका असे शास्त्र सांगते.
स्वप्नात देवाची मूर्ती दिसणे हे शुभ लक्षण आहे, तुमच्या आयुष्यात चांगल्या घटना घडणार असल्याचे ते संकेत आहेत.
स्वप्नात बगीचा दिसणे किंवा बगिच्यात स्वतःला पाहणे हे सुख, वैभव, संपत्तीची भरभराट होणार असल्याचे लक्षण आहे.
वृद्धांची सेवा करताना पाहणे, हे आपल्या पूर्व कर्माचे पुण्य फळाला येणार असल्याचे लक्षण आहे.
स्वप्नात स्वतःचा किंवा प्रियजनांचा मृत्यू पाहणे हेही शुभ मानले जाते, त्यामुळे आयुष्य आणि आरोग्य वाढते.
स्वप्नात निसर्ग पाहणे हे प्रगतीकडे नेणारे लक्षण आहे, मन शांत असल्याचे द्योतक आहे.
कावळा आणि साप सोडून मोर, फुलपाखरू, चिमण्या यांसारखे कोणतेही जीव दिसणे, हे घरात मंगल घटना घडणार असल्याचे संकेत दर्शवते.
सदर माहिती सामान्य गृहीतके आणि स्वप्न शास्त्राच्या मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल.