जास्त पगाराच्या नोकरीसाठी २०२५ मध्ये हवीत ही कौशल्ये 

जास्त पगाराची नोकरी हवी असेल तर फक्त डिग्री पुरेशी नाही

आजच्या काळात, विशेषतः कोरोनानंतरच्या काळात नोकरी मिळवायची किंवा टिकवायची, तर ती अत्यंत कठीण गोष्ट झाली आहे. त्यासाठी आपल्यात काही कौशल्यं हवीत.

कौशल्यं असतील तर आणखी वाढवायला हवीत आणि नसतील तर मिळवायला हवीत. यासाठी जगभरातील कंपन्यांनी प्राधान्य दिलं आहे ते अॅनालिटिकल थिंकिंग, लवचीकता आणि नेतृत्वगुणांना.

कंपनी चालकांना आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये अॅनालिटिकल थिंकिंग, लवचीकता आणि नेतृत्वगुण ही कौशल्यं प्रकर्षानं हवीच आहेत. चांगल्या पगाराच्या नोकऱ्यांसाठी विशेष कौशल्ये आवश्यक असतात.

फोर्ब्सच्या अहवालानुसार ७५ टक्के कंपन्यांना वाटते की महाविद्यालये आणि विद्यापीठे विद्यार्थ्यांना नोकरीसाठी तयार करण्यात अपयशी ठरतात. इंटर्नशिप किंवा व्यावहारिक ज्ञान यामुळे जगाचा अनुभव मिळवता येतो. 

कंपन्या पदवीधरांकडून ग्लोबल माईंटसेट बाळगण्याची अपेक्षा करतात. आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट किंवा विविध प्राध्यापकांच्या संपर्कातून विद्यार्थी ग्लोबल माईंटसेटची कौशल्ये शिकू शकतात.

कंपन्या मानवी आणि परस्परवैयक्तिक कौशल्यांना महत्त्व देतात जसे की संवाद, कुतूहल आणि शिकण्याची इच्छा, सहकार्य, सर्जनशीलता. ही कौशल्ये विश्वास निर्माण करण्यात, संबंध निर्माण करण्याचे काम करतात.

आर्टिफिशियल इंटेलिजेंस हे कौशल्ये शिकणे आवश्यक बनले आहे. एआय शिक्षण विद्यार्थ्यांना अधिक उत्पादक आणि कार्यक्षम, नाविन्यपूर्ण आणि निर्णय घेण्यास आणि समस्या सोडवण्यास मदत करू शकते.

आर्टिफिशियल इंटेलिजेंस शिकणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच टेक्नॉलॉजी स्किल शिकणे देखील महत्त्वाचे आहे. एआय, आयटी आणि डेटा अॅनालिटिक्सची समज असलेल्या उमेदवारांना कंपनी संधी देते.

Click Here