काय आहे चालण्याचा नवा 6-6-6 फॉर्मुला? 

आता चालण्याच्या बाबतीत एक नवा ट्रेंड आला आहे. हा नवा ट्रेंड म्हणजे ६-६-६!

चालणे हा व्यायाम आरोग्यासाठी लाभदायक आहे हे आपण जाणतोच. 

आता स्मार्ट वॉचच्या जमान्यात तुम्ही दिवसभरात किती पावलं चालला हे आपल्याला ट्रॅक करता येतं. 

जाणकारांच्या मते दररोज १० हजार पावलं चालणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं. 

मात्र काही तज्ज्ञांच्या मते आणि काही अभ्यासात असं देखील दिसून आलं आहे की दिवसात ७ हजार पावलं चाललं तरी पुरेसं आहे. 

आता चालण्याच्या बाबतीत एक नवा ट्रेंड आला आहे. हा नवा ट्रेंड म्हणजे ६-६-६!

चालण्याचा हा ६-६-६ ट्रेंडची फोड ही दिवसातून सकाळी किंवा सायंकाळी ६ वाजता ६० मिनिटं चालणं अशी केली जाते. यात ६ मिनिटं वॉर्म अप देखील अॅड करू शकता. 

आता या ट्रेंडचे फायदे जाणून घेऊयात; काही आरोग्यविषयक संस्थांच्या मते आठवड्यातून १५० मिनिट्स व्यायाम निरोगी राहण्यास आवश्यक असतो. 

यामध्ये शरिराला जास्त ताण देणारे व्यायाम आणि वेगानं चालणं यांचा देखील समावेश आहे. 

यामध्ये शरिराला जास्त ताण देणारे व्यायाम आणि वेगानं चालणं यांचा देखील समावेश आहे. 

हेल्थलाईन संस्थेनं सांगितल्याप्रमाणं चालण्यामुळं तुमची मानसिक स्थिती चांगली राहते. 

हेल्थलाईन संस्थेनं सांगितल्याप्रमाणं चालण्यामुळं तुमची मानसिक स्थिती चांगली राहते. 

याचबरोबर चालण्याच्या व्यायामामुळं वजन कमी करण्यास, ब्लड शुगर नियंत्रणात ठेवता येते. 

स्मरणशक्ती वाढणे, हाडांची बळकटी आणि व्याधीमुक्त जीवन असे देखील फायदे चालण्यामुळं होतात. 

Click Here