रिकाम्या पोटी चालावं की जेवणानंतर चालावं असा अनेकांना प्रश्न पडलेला असतो.
जाणकारांच्या मते चालणं हा एक उत्तम व्यायाम आहे. यामुळं तुमचं वजन नियंत्रणात राहतं त्याचबरोबर मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या व्याधी देखील दूर राहतात.
मात्र चालण्याच्या बाबतीत अनेक ग्रह, मत मतांतरं आहेत. रिकाम्या पोटी चालावं की जेवणानंतर चालावं असा अनेकांना प्रश्न पडलेला असतो.
जाणकारांच्या मते तुम्ही चालण्याचा व्यायाम कोणत्या उद्येशानं करता यावर तुम्हा रिकाम्या पोटी की जेवणानंतर चालण्याचा फायदा होईल हे ठरतं.
जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी चालण्याचा व्यायाम करणार असाल तर रिकाम्या पोटी चालणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरतं. यामुळं फॅट ऑक्सिडेशन वाढतं.
ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी चालण्याच्या व्यायाम करत असाल तर जेवणानंतर चालणं तुमच्यासाठी उपयुक्त ठरतं.
अन्नाचं व्यवस्थित पचन होण्यासाठी जेवणानंतर चालणं उत्तम! यामुळं जडत्व कमी होतं आणि पोटफुगी देखील होत नाही.
अनेक अभ्यासात असं दिसून आलं आहे की रिकाम्या पोटी वेगानं चालणाऱ्या लोकांमध्ये मेंटल अलर्टनेस चांगला असतो.
काही लोकं आपल्या सोयीनुसार चालण्याचा व्यायाम करतात. मात्र जर तुम्हाला लो ब्लड शुगर असेल तर तुम्ही काहीतरी खाऊनच चालण्याचा व्यायाम करावा.
एकूण काय तर तुम्ही रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर चालायचं हे तुमच्या उद्देशावर अन् सोयीवर अवलंबून आहे.